डॉ. रसाल यांची सद्गुरु कन्सल्टन्सीला सदिच्छा भेट
आयपीएल २०२६ च्या सिझन मध्ये मुंबई इंडिन्सची आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब कामगिरी
टी २० मुंबई इंडिन्सची टीम म्हटलं की प्रतीस्पर्धा संघाला घाम फुटलाच पाहिजे अशी ही टीम आंतरराष्ट्रीय स्तरावर टी २० असो, एक दिवसीय सामने असे किंवा टेस्ट सेरीज असो प्रत्येक खेळा आपला ठसा उमवटणारे बरेचसे खेळाडू या टीम असतात. अशी ही दिग्गज खेळांडूची टीम २०२६ च्या सिझनमध्ये प्रथमच ढिसाळ कामगिरीमूळे सध्या ९ व्या स्थानावर गेली आहे.
या
सिझन मध्ये आजवर मुंबई इंडिन्सने सुमारे ११ टी २० मॅचेस खेळल्या त्यापैकी फक्त ३
मॅचेस मध्ये त्यांना विजय मिळवता आलाय म्हणजेच सुमारे ८ मॅचेसमध्ये त्यांचा पराभव
झाला आहे.
सुरवातीच्या
काही मॅचेच गमवल्यानंतर मुंबई इंडिन्स पुन्हा जोमाने येते आणि मागून पुढे जाते हा अनुभव...
पण तो या वर्षी मात्र दिसला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम क्रिकेटप्रेमींची
तीव्र निराशा झाली आहे.
प्रतिस्पर्धेतील
टीम्स ज्या जिगरबाजपणे मैदानात उतरुन कांटे की टक्कर करुन खेळत आहे ती खरच वाखाणण्याजोगी
आहे. अशा टिम्समधील अनेक खेळाडू तर नवीन आहेत. तर मग मुंबई इंडिन्स अनुभवी खेळाडूंचा
काय फायदा अशी चर्चा सध्या क्रिकेटप्रेमी यांच्यात रंगू लागली आहे.
यामुळे सध्यातरी दुस-या राज्यातील टी २० क्रिकेट टीम्स कशा खेळत आहेत त्यांच्या खेळांचा आस्वाद घेत राहणे एवढच काय ते महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींच्या हातात आहे.
माहिती स्त्रोत https://www.iplt20.com/
Comments
Post a Comment