डॉ. रसाल यांची सद्गुरु कन्सल्टन्सीला सदिच्छा भेट

Image
  सातारा, दि. २४ ऑगस्ट २०२६ : Dr. Rasal’s Sunder Educational Consultancyचे डॉ. रसाल यांनी सातारा दौऱ्यादरम्यान सद्गुरु कन्सल्टन्सी, सातारा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित MBBS विद्यार्थ्यांशी संवाद साधत परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः रशियामधील MBBS शिक्षण , तेथील शैक्षणिक संधी, प्रवेश प्रक्रिया तसेच MBBS क्षेत्रातील आगामी बदल आणि महत्त्वाच्या बाबींविषयी डॉ. रसाल यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमास सद्गुरु कन्सल्टन्सीच्या CEO सौ. मेघा पवार , Digital Shende, Satara चे श्री. सतीश शेंडे , सौ. ज्योती शेंडे तसेच MBBS प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता निर्माण व्हावी, या दृष्टीने हा संवाद उपयुक्त ठरला. Dr. Rasal’s Sunder Educational Consultancy ही परदेशातील MBBS शिक्...

वाठार-किरोलीत करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५ विद्यार्थ्यांची सायकोमेट्रिक चाचणी


वाठार-किरोली, ता. २८ (प्रतिनिधी) — विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी-क्षमता ओळखून योग्य करिअरची निवड करावी, या उद्देशाने श्री अंबामाता विद्यालय, वाठार-किरोली येथे ‘धनश्री कन्सल्टन्सी’, सातारा तर्फे आयोजित एकदिवसीय करिअर गाईडन्स कार्यशाळा उत्साहात पार पडली. २८ मार्च रोजी झालेल्या या उपक्रमात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण म्हणजे सुमारे ४५ विद्यार्थ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने घेण्यात आलेली सायकोमेट्रिक चाचणी. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, आवडीनिवड आणि व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्यांना योग्य करिअरच्या दिशेने मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत ‘धनश्री कन्सल्टन्सी’च्या संस्थापक सौ. मेघा संतोष पवार यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती देताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. तसेच, करिअर निवडीत योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.

करिअर मार्गदर्शक सौ. तनया घोरपडे यांनी “आजच्या स्पर्धात्मक युगात करिअर गाईडन्स का आवश्यक आहे?” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. योग्य वेळी घेतलेले निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्याला दिशा देतात, यावर त्यांनी भर दिला.

दरम्यान, ‘डिजिटल शेंडे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सतीश शेंडे यांनी विद्यार्थ्यांची सायकोमेट्रिक चाचणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली. चाचणीचे तत्काळ विश्लेषण करून प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या क्षमतेनुसार वैयक्तिक करिअर मार्गदर्शन देण्यात आले.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. मनीषा निवास पाटील तसेच प्राध्यापक तानाजी लक्ष्मण पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

योग्य वयात मिळालेल्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले असून ‘धनश्री कन्सल्टन्सी’च्या या उपक्रमाचे वाठार-किरोली परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.


 



Comments