डॉ. रसाल यांची सद्गुरु कन्सल्टन्सीला सदिच्छा भेट

Image
  सातारा, दि. २४ ऑगस्ट २०२६ : Dr. Rasal’s Sunder Educational Consultancyचे डॉ. रसाल यांनी सातारा दौऱ्यादरम्यान सद्गुरु कन्सल्टन्सी, सातारा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित MBBS विद्यार्थ्यांशी संवाद साधत परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः रशियामधील MBBS शिक्षण , तेथील शैक्षणिक संधी, प्रवेश प्रक्रिया तसेच MBBS क्षेत्रातील आगामी बदल आणि महत्त्वाच्या बाबींविषयी डॉ. रसाल यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमास सद्गुरु कन्सल्टन्सीच्या CEO सौ. मेघा पवार , Digital Shende, Satara चे श्री. सतीश शेंडे , सौ. ज्योती शेंडे तसेच MBBS प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता निर्माण व्हावी, या दृष्टीने हा संवाद उपयुक्त ठरला. Dr. Rasal’s Sunder Educational Consultancy ही परदेशातील MBBS शिक्...

नवा शक्तीपीठ महामार्ग: 13 जिल्हे, 856 किमी लांबी – महाराष्ट्रासाठी गेमचेंजर प्रकल्प

 

New highway route for Shaktipeeth Mahamarg


महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या महामार्गाची नवीन अलाईनमेंट (route) जाहीर केली असून, यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आता या मार्गामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रकल्पाचे महत्त्व आणखी वाढले आहे.

 महामार्गाची नवी रचना आणि लांबी

यापूर्वी मंजूर असलेली सुमारे ८०२ किमी लांबी होती ती आता सुमारे ८५६ किमी करण्यात आली आहे. या महामार्गाचा सुरुवातीचा पॉइंट वर्ध्याजवळील पवनार ऐवजी दिग्रस परिसरात हलवण्यात आला आहे. तसेच, शेवटचा टप्पा पत्रादेवीऐवजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे असेल.

 १३ जिल्हे आणि ४० + तालुके जोडले जाणार

हा महामार्ग एकूण १३ जिल्ह्यांमधून जाणार असून, सुमारे ४० पेक्षा अधिक तालुक्यांना जोडणार आहे. वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मोठे बदल नाहीत, मात्र नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार असून त्या संबंधीचा आराखडा पुढील प्रमाणे दिसत आहे.

shaktipeeth-mahamarg-new-route-maharashtra-13-districts-856km

 धार्मिक पर्यटनाला चालना

या महामार्गामुळे राज्यातील सुमारे २१ एकवीस प्रमुख धार्मिक स्थळे एकमेकांशी जोडली जाणार आहेत हे या महामार्गाचे वैशिष्टये मानावे लागेल या धार्मिक स्थळांमध्ये माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूरसारखी प्रसिद्ध शक्तीपीठे समाविष्ट आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून यासंबंधीत सेवा उद्योग आणि रोजगार क्षमताही वाढण्याची संधी दिसून येते.

 प्रवास वेळेत मोठी बचत

सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी १८ तास लागतात, परंतु या महामार्गामुळे हा प्रवास केवळ ८ तासांमध्ये पूर्ण होणार आहे. साहजिकच यामुळे व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.

गावांवर कमी परिणाम

या प्रकल्पातील महत्त्वाची बाब म्हणजे हा महामार्ग गावांच्या मधून न जाता त्यांच्या बाजूने नेण्यात आला आहे. त्यामुळे जमीन संपादन आणि स्थलांतराचे प्रमाण कमी राहणार आहे. 

 विदर्भ ते कोकण जोडणारा कॉरिडॉर

हा मार्ग विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडत कोकणापर्यंत पोहोचतो. अनेक ठिकाणी सरळ (straight) अलाईनमेंट ठेवण्यात आली असून, काही संवेदनशील भागांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

 शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रासाठी केवळ रस्ता नसून आर्थिक आणि धार्मिक विकासाचा नवा मार्ग ठरणार आहे. सुधारित अलाईनमेंटमुळे अधिक जिल्हे जोडले जातील आणि राज्यातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल.

 अशाच अपडेट्ससाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा.

Comments