डॉ. रसाल यांची सद्गुरु कन्सल्टन्सीला सदिच्छा भेट

Image
  सातारा, दि. २४ ऑगस्ट २०२६ : Dr. Rasal’s Sunder Educational Consultancyचे डॉ. रसाल यांनी सातारा दौऱ्यादरम्यान सद्गुरु कन्सल्टन्सी, सातारा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित MBBS विद्यार्थ्यांशी संवाद साधत परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः रशियामधील MBBS शिक्षण , तेथील शैक्षणिक संधी, प्रवेश प्रक्रिया तसेच MBBS क्षेत्रातील आगामी बदल आणि महत्त्वाच्या बाबींविषयी डॉ. रसाल यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमास सद्गुरु कन्सल्टन्सीच्या CEO सौ. मेघा पवार , Digital Shende, Satara चे श्री. सतीश शेंडे , सौ. ज्योती शेंडे तसेच MBBS प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता निर्माण व्हावी, या दृष्टीने हा संवाद उपयुक्त ठरला. Dr. Rasal’s Sunder Educational Consultancy ही परदेशातील MBBS शिक्...

जसप्रीत बुमराहची ‘शून्य’ कमाल! आयपीएलमध्ये ५ सामने, १९ षटके, पण एकही विकेट नाही!

IPL 2026: Jasprit Bumrah 0 Wickets in 5 Matches

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सोशल मिडीयवर चर्चेत अडकल्याचं पाहायला मिळत आहे. स्पर्धेतील पाच सामने संपले, पण बुमराहच्या नावावर अद्याप एकही विकेट नाही! आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच बुमराह एवढा निष्फळ ठरत चालला आहे. त्याचे चाहते यामूळे कमालीचे अस्वस्थ आहेत, कारण एकेकाळी हमखास विकेट देणारा हा वेगवान गोलंदाज पाच सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही याची चर्चा सध्या नेटीझन्समध्ये जोरात सुरु आहे,

११४ चेंडूत शून्य विकेट

बुमराहने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये एकूण १९ षटके टाकली आहेत. या षटकांत त्याने १६४ धावा दिल्या आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट ८.६३ आहे. म्हणजे तो प्रत्येक षटकात सरासरी ८ ते ९ धावा देत आहे. गेल्या पाच सामन्यांत त्याने एकूण ११४ चेंडू टाकले आहेत, पण एकही विकेट त्याला घेता आलेली नाही. ही आकडेवारी त्याच्या चाहत्यांसाठी निश्चितच धक्कादायक आहे, कारण हा जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक मानला जातो. स्पर्धेतील यापूर्वीच्या कामगिरीपेक्षा यंदाची बुमराहची कामगिरी खूपच खालावली आहे. त्याच्या या खराब कामगिरीमुळेच मुंबई इंडियन्सच्या पाच सामन्यांपैकी चार सामने हातातून गेले आहेत असं बोलल जावू लागल आहे.

बुमराह का विकेट घेऊ शकत नाहीये?

जसप्रीत बुमराह सध्या एवढा संघर्ष का करत आहे, यावर मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. ते म्हणाले, “बुमराह चांगली गोलंदाजी करतो आहे, पण आम्ही पॉवरप्लेमध्ये दबाव निर्माण करू शकत नाही. विरोधी संघाला माहीत आहे की त्यांना बुमराहविरुद्ध मोठा धोका पत्करायची गरज नाही”.

जयवर्धने यांनी हेही उघड केले की विश्वचषकातून आलेल्या ‘निगल’ (स्नायूंच्या जखमेचा त्रास) मुळे बुमराहचा वेग कमी झाला आहे. बुमराहचा सरासरी वेग यंदा फक्त १३० किमी प्रतितास इतकाच राहिला आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी बुमराहच्या कामगिरीचे विश्लेषण केले आहे. पठाण यांच्या मते, बुमराह आता खूप जास्त मंद चेंडू टाकतोय. या हंगामात त्याने ४४ टक्के मंद चेंडू टाकले आहेत. म्हणजे त्याच्याप्रत्येक दुसरा चेंडू हा मंद असतो. पठाण म्हणाले, “जर बुमराहने आपले वेगवान चेंडूंचे प्रमाण वाढवले आणि मंद चेंडूंचे प्रमाण ३०-३५ टक्क्यांपर्यंत खाली आणले तर त्याची कामगिरी नक्की सुधारेल”.

मुंबई इंडियन्सची हालत काय?

बुमराहची विकेट्स न मिळणे ही एकट्याची समस्या नाही तर संघातील इतर गोलंदाजही सध्या तितकेसे प्रभावी दिसत नाहीत. मुंबईने इंडियन्सने आतापर्यंत पाच सामन्यांत ९७२ धावा दिल्या आहेत. संघाचा इकॉनॉमी रेट १०.२६ आहे, जो या हंगामातील सर्वात वाईट आहे. यामुळेच मुंबई इंडियन्सने पाच सामन्यांत एकच जिंकला आहे आणि ती गुणतक्त्यात अव्वालीतून नवव्या स्थानावर घसरली आहे.

पंजाबविरुद्ध बुमराह महागडा

गुरुवारी (१६ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात बुमराहने ४ षटकांत ४१ धावा दिल्या आणि कोणतीही विकेट घेऊ शकला नाही. यावेळी त्याचा इकॉनॉमी रेट १०.२५ होता. बुमराहविरुद्ध पंजाबच्या कर्णधार श्रेयस अय्यरने सहा षटकार मारून आपली विशेष छाप सोडली. मुंबईने १९५ धावांचा डोंगर उभारला होता, पण बुमराह आणि इतर गोलंदाजांनी हा बचाव करू शकले नाहीत.

जसप्रीत बुमराहची ही खराब कामगिरी मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखीची बाब ठरली आहे. एकेकाळी सामन्याचा निकाल बदलणारा हा गोलंदाज आता केवळ धावा देत आहे. बुमराह जर या अवस्थेतून लवकर बाहेर आला नाही तर मुंबई इंडियन्सचे प्ले-ऑफचे स्वप्न गुलाबी होईल. आता सर्वांचे लक्ष बुमराहकडेच लागले आहे, येणा-या पुढील सामन्यात तो नक्कीच हरवलेला सुर पुन्हा एकदा मिळवेल अशी चाहत्यांची आशा आहे.

सदरची माहिती दि. १७.४.२०२६ स्त्रोत https://www.iplt20.com/players/jasprit-bumrah/1124 वर आधारीत आहे.

Comments