डॉ. रसाल यांची सद्गुरु कन्सल्टन्सीला सदिच्छा भेट
| स्त्रोत - https://timesofindia.indiatimes.com/ |
होय... २०२३ मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम, गुजरात येथे भारताने एक दिवसीय सामन्यातील वर्ल्ड कप निसटत्या बाबींमूळे हरला होता. तेव्हापासून भारताला फायनल मॅचसाठी हे स्टेडियम चांगले नाही अशा प्रकारच्या सोशल मिडीयावर सतत पहावयास मिळत होत्या.
२०२६ मधील फायनल या स्टेडियम होणार तीही न्युझीलंड विरुद्ध अर्थातच तमाम भारतीयांचा जोश ७ व्या चंद्रावर होता. महाराष्ट्रातून तर या सामन्यासाठी विशेष गाड्याही तैनात करण्यात आल्या होत्या. इतिहास पाहता मॅचचा निकाल काही लागो मॅचचा आस्वाद मात्र घ्यायचा हे आपल्या अबालवृद्धांचे धेय्य... नाही का...
पूर्ण भारतात अनेकजण मिळेल तिथे मोबाईल वर, कोणी सिनेमा थिएटर मध्ये तर कोणी भला मोठा स्क्रीन लावून टक लावून मस्त पैकी मॅच पाहताना दिसत होते. त्यात मॅचचा दिवस म्हणजे रविवार सोन्याहून पिवळे...
आजची न्युझीलंड विरुद्धची मॅच तशी पाहिली तर औरच होती... हेड टू हेड स्टॅट पाहायचा झाला तर एकूण ३४ मॅचपैकी न्युझीलंडने ११ तर भारताने १९ वेळा मॅच जिंकली आहे तर ३ वेळा टायअप झाले होते.
८ मार्च २०२६ च्या फायनल मध्ये न्युझीलंडने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण म्हणजेच फिल्डींगचा निर्णय घेतला. कॅप्टन Mitchell Santner ला वाटलं असाव भारत तर या स्टेडियमवर फायनल जिंकत नाही आपण सहज त्यांना कमी धावांवर गुंडाळून ठेवू शकतो आणि सहज धावांचा पल्ला गाठू शकू..
पण झालं उलटचं... Sanju Samson ने १९३.४८ स्ट्राईकने ८९ धावांचा पाऊस पाडला तर ब-याच वेळा आउट होणा-या Abhishek Sharma ने २४७.६२ स्ट्राईक रेटने २१ चेंडूत ५२ धावा केल्या. तर Ishan Kishan ने २१६ च्या स्ट्राईकने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. भरीस भर Shivam Dube ने ३२५ च्या स्ट्राईक रेटने ८ चेंडूत २६ धावा केल्या. यांच्या खेळीने न्युझीलंडचे तोंडचे पाणी पळाले कारण भारताने त्यांच्यासमोर २५६ धावांचा डोंगर उभा केला.
या धाव संख्येचा पाठलाग करणे न्युझीलंडने सोडूनच दिल्याचे लक्षात आले. कारण Tim Seifert ५२ धावा आणि Mitchell Santner ४३ वगळता इतर कोणत्याही खेळाडूला साधं २० धावा करता आल्या नाहीत.
भारताच्या Jasprit Bumrah ४ विकेट आणि Axar Patel च्या ३ विकेट यांच्या अचूक भेदक गोलंदाजी पूढे तसचं कर्णधार SuryaKumar Yadav च्या कुशल नेतृत्वात न्युझीलंड संघ १५९ धावांत पूर्ण ऑलआउट झाला.
आणि भारताने २००७, २०२४ आणि २०२६ असे तीन T20 वर्ल्ड कप जिंकून सलग दुस-यांदा विजय मिळवला आहे.
यासाठी भारतीय टीम चे आणि ही मॅच पाहणा-या तमाम क्रिकेटप्रेंमीचे हार्दिक अभिनंदन..!
Comments
Post a Comment