डॉ. रसाल यांची सद्गुरु कन्सल्टन्सीला सदिच्छा भेट

Image
  सातारा, दि. २४ ऑगस्ट २०२६ : Dr. Rasal’s Sunder Educational Consultancyचे डॉ. रसाल यांनी सातारा दौऱ्यादरम्यान सद्गुरु कन्सल्टन्सी, सातारा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित MBBS विद्यार्थ्यांशी संवाद साधत परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः रशियामधील MBBS शिक्षण , तेथील शैक्षणिक संधी, प्रवेश प्रक्रिया तसेच MBBS क्षेत्रातील आगामी बदल आणि महत्त्वाच्या बाबींविषयी डॉ. रसाल यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमास सद्गुरु कन्सल्टन्सीच्या CEO सौ. मेघा पवार , Digital Shende, Satara चे श्री. सतीश शेंडे , सौ. ज्योती शेंडे तसेच MBBS प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि परदेशातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधींबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता निर्माण व्हावी, या दृष्टीने हा संवाद उपयुक्त ठरला. Dr. Rasal’s Sunder Educational Consultancy ही परदेशातील MBBS शिक्...

गुढीपाडवा 2026: अवकाळी पावसाने रंग बदललेले मराठी नववर्ष!

 

Gudi Padwa 2026 The Marathi New Year Transformed by Unseasonal Rains

माणसाने कितीही प्रगती केली तरी तो निर्सगावर कधीच विजय मिळवू शकतं नाही, हे खरच आहे. २०२६ च्या मार्च महिन्यात अगदी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चक्क पावसाने हजेरी लावली...

वाचून आश्चर्याचा धक्का बसला ना...

होय... हे खरं आहे. अहो... गुढीपावडा म्हणजे रखरखीत उन्ह आणि दुपारचा सोसाट्याचा वार हे गणित या वर्षी निसर्गाने चूकवलयं बरं का...

मराठी माणसाचं नविन वर्ष गुढीपाडव्याने सुरु होतं. गुढीपाडवा म्हणजे महिलांसाठी हक्काची साडी... नवीन कळक... त्यावर पारंपारिक पद्धतीने सजवलेली गुढी त्यावरच्या गोड घाटी, लिंबाचा पाला... फक्त आजच्या दिवशी ज्याला मानं ती... तसचं वा-याच्या तालावर गुढी उतरवण्यासाठीची लगबग या अवकाळी पावसाने अगदी वेगळ्याच स्तरावर नेवून ठेवली.

गेल्या वर्षी २०२५ मध्ये पावसाने विविध भागात पार थैमान घातल होत. तो थांबला तेव्हा अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला... खरतर पाऊस हा हवाच पण किती याला ही मर्यादा आहेच की...

माणसाला खरं तर आवश्यक हे असे तिन्ही ऋतू आपल्याकडे आहेत, हे आपले भाग्यच पण गेल्या काही वर्षांपासून या सर्वच ऋंतूच कालचक्रच बिघडून गेल आहे. उन्हाळा असह्य म्हणावा तर पाऊसही तसाच आणि हिवाळाही तसाच होऊ लागला आहे.

पुढील ३ तास ..... जिल्ह्यात विजांच्या कडकडाट,मेघगर्जना,हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व काही भागात ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याची दाट व गारपिटीचीही शक्यता आहे. मंत्रालय.... असा मेजेस मोबाईल गुढीपाडवाच्या दिवशी आला तेव्हा वाटलं काहीतरीच काय... आज कसा काय पाऊस येईल... बरं आलाच तर सोसाट्याचा वारा आणि गारपिट... हसत विषय सोडून दिला.

दुपारीच पावसाने दाखवून दिलं मंत्रालयाचा मेसेज खराच होता... चुकीचा नव्हता... सतत पाऊस सुरु राहिल्याने बाहेरही जाता आलं नाही...

गुढीवरची साडी पूर्ण भिजून गेली... घाटी भिजल्याने त्यांचा रंग आणि गोडवा साडीवर विरघळला... निसर्गच्या या वेगळ्या करामतीमूळे २०२६ चा गुढीपाडवा काही वेगळ्याच उंचीवर गेल्याच बोललं जातयं...

तुमचा अनुभव काय...

तुमच्या भागातही पाऊस आला होता का... गुढीपाडव्याचा तुमचा अनुभव कसा होत... खाली कमेंट करुन नक्की सांगा...

कारण यंदाचा २०२६ गुढापाडवा प्रत्येकासाठी वेगळा होता...


Comments